HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपची उत्तराखंडमध्ये काँग्रेसवर टीका!

नवी दिल्ली। हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने जागा जिंकल्यानंतर आता, उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ नये याची दक्षता सत्ताधारी भाजप घेत असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत आला तर भ्रष्टाचार सुरू होईल, असा प्रचार आता भाजपने सुरू केला असून राज्या-राज्यात काँग्रेस काळातील भ्रष्टाचाराचा पाढा आता मतदारांपुढे उभा करण्याची रणनिती भाजपने आखली आहे. काँग्रेस आणि कमिशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे काँग्रेस असेल, तिथे कमिशन असेलच पण, जिथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) असेल, तिथे स्वच्छ कारभार असेल, असे नमूद करत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उत्तर प्रदेशनंतर उत्तराखंडमध्येही निवडणूक प्रचाराचे रणिशग फुंकले.

मतदारांच्या मनात खोलवर रुजवायचा जणू सपाटाच

भाजपचे जे. पी. नड्डा हे दोन दिवसांच्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी काँग्रेसवर टीका केली. चमोलीमध्ये शहीद सन्मान यात्रेला नड्डा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. सुमारे ४० वर्षांमध्ये काँग्रेसने जवानांना आमिषे दाखवली, त्यांची दिशाभूल केली असा आरोप नड्डा यांनी केली. उत्तरखंडमध्ये भाजपची सत्ता असून वर्षभरात तिथे दोन मुख्यमंत्री बदलण्याची नामुष्की आली. उत्तराखंडमध्ये विधानसभेत काँग्रेसकडून आव्हान निर्माण होण्याची शक्यता असल्याने भाजपने काँग्रेस काळातील भ्रष्टाचाराचा मुद्दा आता मतदारांच्या मनात खोलवर रुजवायचा जणू सपाटाच लावला आहे.

जेपी नड्डा सदगृहस्थ आहेत

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील सरकार उखडून फेकण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून राऊतांनी जोरदार हल्ला चढवला आहे. जेपी नड्डा सदगृहस्थ आहेत. चांगले नेते आहेत. नड्डा यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार उखडून फेका. पण महाराष्ट्रातील सरकार उखडण्याची भाषा करण्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशात चीनने घुसखोरी करून गावंच्या गावं वसली आहेत. ती आधी उखडून फेकावीत. जम्मू -काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. दहशत निर्माण झाली आहे. अतिरेक्यांचे अड्डे निर्माण झाले आहेत. हे अड्डे आधी उखडून फेका, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…पण मी एकटा मुंबईला जाणार नाही, संभाजीराजेंची स्पष्ट भूमिका

News Desk

कृत्रिम तलावांमधील ‘श्रीं’च्या विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद, ठाणे शहरात दीड दिवसांच्या 8979 गणेशमूर्तींचे विसर्जन

News Desk

भावाला मंत्री केलं नाही म्हणून राऊत बिथरले । विनोद तावडे

swarit