HW News Marathi
महाराष्ट्र

“खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात” – संजय राऊत


सिल्वासा। शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दौरा सध्या दादरा नगर हवेलीत सुरू आहे. लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राऊत हे मैदानात उतरले आहेत. शिवसेनेनं दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीसाठी कलाबेन डेलकर यांना उमदेवारी दिलीय. दादरा नगर हवेलीच्या मुद्यासोबत एनसीबीवरुन संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. NCB ने अनेक प्रकरणे केली. रिया चक्रवर्ती प्रकरणात काय झाले ? एका प्रकारे खंडणीखोरी आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, अशी टीकेची झोड आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर उठवली आहे.

डेलकर यांच्या चिट्ठीत अनेकांची नावे

ज्येष्ठ खासदार आपलं जीवन संपवतो आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला वाटलं नाही की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी ? महाराष्ट्र सरकार ती चौकशी करतेय पण केंद्र सरकारची पण जबाबदारी होती. भाजपचे अनेक लोक या प्रकरणाशी संबंधीत कारण डेलकर यांच्या चिट्ठीत अनेकांची नावे. इथल्या प्रशासकाचे नाव त्या चिठ्टीत होतं. अशा प्रकारच्या निवडणुका भाजपने लढवल्या नाहीत का ? आम्हाला खडणीखोर म्हणत असाल तर इथे भाजप प्रशासकाच्या खंडणीखोरीवर फडणवीस बोलत नाहीत ? इथली जनता त्रस्त आहे…म्हणून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. मिस्टर फडणवीस खंडणीखोर सैतानाची तरफदारी करीत आहेत,असं संजय राऊत म्हणाले. आम्हाला ख्रात्री पूर्ण खात्री ही जागा जिंकतोय आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येतील,असंही संजय राऊत म्हणाले.

भाषणात ते टाळीची वाक्ये घेतात

फडणवीस यांना बोलायचे ते बोलू द्या, भाषणात ते टाळीची वाक्ये घेतात. पण, काल इथे त्यांना टाळ्याही पडल्या नाहीत, असे मला कळाले. फडणवीस यांना वाटत असेल की ते इथे आल्याने मराठी मतदान भाजपच्या पारड्यात पडेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. इथली मराठी जनता पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे. तपास यंत्रणांचा वापर हा केंद्राचा महाराष्ट्र सरकार विरोधातील कट आहे. स्वतः मुख्यमंत्रीही तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात सरकार आले नाही याचा राग काढला जात आहे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे, कुणापुढे झुकणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले. गेल्या काही काळात एनसीबीनं अनेक प्रकरणे केली. रिया चक्रवर्ती प्रकरणात काय झाले ? एका प्रकारे खंडणीखोरी आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, असं राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय बोलतात यावर परसेप्शन ठरत नाही. आमच्या दलालीवर बोलता, आम्ही तोंड उघडले आणि दिल्लीतील आणि महाराष्ट्रातली पाच वर्षांची, गुजरातची 20 वर्षे तर दलाली काय याचा खरा अर्थ देशाला कळेल. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा इशारा देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला दिला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाणे स्थानकात फुकट्याकडून तब्बल 57 लाखांची दंडवसुली

News Desk

२०१९-२० मध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाईच नाही!

News Desk

Kolhapur Elections: कोल्हापुरचं मैदान कोण मारणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

Manasi Devkar