HW News Marathi
देश / विदेश

भाजपनेचं उदयनराजेंचा साताऱ्यात पराभव घडवून आणला, राऊतांचा खळबळजनक खुलासा..

पुणे | उदयनराजे भोसले हे जर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील, तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असे आव्हान संजय राऊत यांनी पुण्याच्या एका कार्यक्रमात दिले. आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकानंतर संपुर्ण महाराष्ट्रात गदारोळ माजला,त्यानंतर या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. मात्र या पुस्तकाच्या माध्यमातुन शिवरायांचा केलेला अपमान शिवरायांच्या वंशंजांना मान्य आहे का असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला,त्यानंतर उदयनराजेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेना काढताना शिवरायांच्य वंशजांनी विचारले होते का असा प्रतिप्रश्न केला. संजय राऊतांनी थेट उदयनराजेंना वंशज असल्याचे पुरावे मागितल्याने आज सातारामध्ये मुक मोर्चा काढून राऊतांचा निषेध केला जाणार आहे.

हे सगळे प्रकरण चालु असताना दुसरीकडे संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्विट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे..छत्रपतींच्या प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती उदयनराजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला..हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे..त्या बद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरवरून भाजपवर उदयनराजे भोसलेंचा पराभव घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते भाजपात गेले, पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर आता उदयनराजेंचा पराभव भाजपानेच केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शिवसेना खासदारा संजय राऊत यांनी केलेले ट्विट

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसचं आंदोलन पेटलं, प्रियांका गांधींना घेतलं ताब्यात

News Desk

पवार विरोधी पक्षात असते तर त्यांनी ढोंगीपणा आणि नाटकं केली असती !

Arati More

भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी मंगळसूत्र आणि स्मार्टफोन

swarit