HW News Marathi
देश / विदेश

तुम्ही भले कंगनाच्या मताशी सहमत नसाल पण…! | देवेंद्र फडणवीस

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “कंगना राणावत जे काही म्हणाली, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. भाजपासुद्धा त्याचा निषेधच करत आहे. तुम्ही भले कंगना राणावतच्या मताशी सहमत नसाल पण प्रत्येक नागरिकांची सुरक्षितता जपणे ही राज्याची जबाबदारी आहे”, असे आज (७ सप्टेंबर) देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वच स्तरांतून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली. “मला संजय राऊत यांनी मुंबईत न येण्यासंबंधी उघड धमकी दिली.मुंबई आता पाकव्याप्त काश्मीरसारखी झाली आहे का ?”, असा सवाल कंगनाने उपस्थित केला. त्यानंतर, राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. राजकीय, कला क्षेत्रासह अनेक स्तरांतून प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली. शिवसेनादेखील चांगलीच आक्रमक झाली.

राज्यातील सत्ताधारी पक्षाची कंगना राणावत संदर्भातील भूमिका पाहता केंद्र सरकार कंगनाच्या मदतीला धावून आल्याचे म्हटले जात आहे. कारण, केंद्राकडून आता अभिनेत्री कंगना राणावतला Y + सिक्युरिटी देण्यात आली आहे. याबाबत, कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे जाहीर आभार देखील मानले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपच्या २० आमदारांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा

News Desk

भारत अहिंसेच्या मार्गाने चालणारा देश, भागवतांनी केले गांधीजींच्या कार्याचे कौतुक

News Desk

‘मनसे’ची मतं आमच्याशी जुळली तर नक्कीच…! फडणवीसांनी दिले नवे संकेत

News Desk