HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावमधील ‘त्या’ नगरसेवकांविरोधात भाजपची ३० हजार पानी याचिका दाखल

जळगाव | जळगाव महापालिका महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणूकीत शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिला होता. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुटून शिवसेनेच्या गोटात गेलेल्या भाजपच्या २७ नगरसेवकांवर पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत अपात्र ठरवावे यासाठी आज (३१ मार्च) नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी तब्बल ३० हजार पानांची याचिका दाखल केली आहे. यावेळी नाशिक महापालिकेचे गटनेते जगदीश पाटील व अॅड. संदीप भगत आदी उपस्थित होते. पक्षांतर बंदीच्या कायद्यान्वये अपात्रतेसाठी दाखल करण्यात आलेली ३० हजार पानांची याचिका ही एकमेव असल्याचा दावा करण्यात येत आहे.

महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडली होती. भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे भाजपचे महापौर पदाचे उमेदवार प्रतिभा कापसे व उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौरपदी भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील हे विजयी झाले होते. भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता पक्षाशी गद्दारी केल्याने त्यांचे नगरसेवक पद करण्यात यावे याकरता जळगाव मनपा भाजप गटनेता भगत बालानी यांनी आज दुपारी १ वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली.

दरम्यान, महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान ऑनलाइन महासभेत नगरसेवक व मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्यतिरिक्त इतर जण सहभागी झाल्यामुळे ही महासभा बेकायदेशीर असल्याबाबत देखील भाजपकडून न्यायालयात स्वंत्रत याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही भगत बालाणी यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

भाजपची एकहाती सत्ता असून देखील जळगावात भाजपला पराभवाची धूळ चारण्याचा सगळा प्लॅन गेल्या १० दिवसांत जुळून आल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. शिवाय, या प्लॅनबद्दल फारसं कुणाला काही माहिती नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत. “जळगावात भाजपाची एकहाती सत्ता होती. पण कामं होत नसल्यामुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनता देखील नाराज होती. त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावाच लागला नाही”, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, जळगाव महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेविषयी देखील एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. “१० दिवसांपूर्वी याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन. नुसतं आवाहन केलं, तर नगरसेवक जमू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटूनही गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले २२ होते, शिवसेनेचे १५ होते आणि एमआयएमचे ३ आमच्याकडे आलेच होते”, असं खडसेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपचे जळगावमधील नेते गिरीश महाजन यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये गर्विष्ठपणा आहे. नगरसेवकांना तुच्छ लेखणं, स्थानिक मागण्यांकडे दुर्लक्ष करणं हे होत होतं. त्यामुळे नगरसेवकांना फार आग्रह करावाच लागला नाही. यापैकी बरेच जण महिन्याभरापासून माझ्यामागे फिरत होते. गिरीश महाजनांविषयी प्रचंड नाराजी होती” असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे गिरिश महाजनांना त्यांच्या बालेकिल्यात पराभवाला समाेरं जावं लागल्याने त्यांच्याकडून याची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल होते

भाजपचे ५७ पैकी तब्बल २७पेक्षा अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा आहे. याबाबत भाजपच्या सूत्रांनी देखील दुजोरा दिला होता. विशेष म्हणजे भाजपकडून व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक सहलीवर गेले होते. जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत होते. महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्चला संपणार होता. १८ मार्चला नवीन महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यासाठी १५ मार्चला माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक सहलीवर गेले. रविवारी दुपारी २ वाजेपासून भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीएमसीच्या प्रभागात वाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

News Desk

राज्यातल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची महत्त्वपूर्ण माहिती…!

News Desk

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणात आणखीनच वाढ!

News Desk