HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजपने बेरोजगारांच्या हातात घंटा दिल्या, वाजवत बसा अन् मंदिरे उघडा” शिवसेनेचा केंद्रावर निशाणा!

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दाखवलेल्या ‘अच्छे दिन’चे विदारक चित्र समोर आले आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी देशाच्या जीडीपीचे गुलाबी चित्र दोन दिवसांपूर्वीच रेखाटले. त्या गुलाबाचे काटे आता टोचू लागले आहेत आणि पाकळ्या झडू लागल्या आहेत असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे.सामानाच्या अग्रलेखाच्या म्हटलं आहे, ऑगस्ट महिन्यात 16 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. ग्रामीण भागात बेरोजगारीने कहर केला आहे. शहरांतही वेगळी स्थिती नाही. लोकांना, तरुणांच्या हाताला काम हवे आहे. भाजपने बेरोजगारांच्या हाती घंटा दिल्या आहेत. घंटा वाचवत बसा व मंदिरे उघडा अशी मागणी करत रहा असे बजावले आहे.

घंटा लावून रोजगार निर्मितीचे दालन उघडायला हवे

घंटा बडवून वगैरे बेरोजगारीचा राक्षस मारला जाणआर असेल तर देशाच्या उद्योग मंत्रालयाने एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या दारात आता घंटा लावून रोजगार निर्मितीचे दालन उघडायला हवे. 16 लाख हा आकडा अलीकडचा आहे. मोदी सरकारने जी बेजबाबदार नोटबंदी देशावर लादली, त्या नोटबंदीने कोसळलेल्या अर्थव्यवस्थेखालीच दोनएक कोटी रोजगार चिरडला गेला. नोटबंदी हे अर्थव्यवस्थेवरचे भयंकर संकट होते व त्यातून दोन कोटींवर लोकांनी कायमच्या नोकऱ्या गमावल्या असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

अंध भक्तांनी सरकारची आरती ओवाळायला व मंदिरांच्या नावाने राजकीय घंटा बडवायला काहीच हरकत नाही, पण लाखो लोकांनी रोजगार गमावला आहे आणि त्यातून जे आर्थिक अराजक निर्माण झाले आहे त्याचे काय? या संकटाचा सामना केंद्र सरकार कसा करणार आहे? नोकऱ्यांचे काय करणार? असा सवालही विचारण्यात आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

Aprna

अशा वातावरणात ‘ते’ माझ्या मनाला पटत नाही, वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

News Desk

हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, किरीट सोमय्यांचं महाविकास आघाडीला आव्हान!

News Desk