HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपला सलग दुसरा धक्का ! हेमेंद्र मेहतांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई । भाजपला शिवसेनेकडून आता आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत आज (६ फेब्रुवारी)शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ दिवसांत भाजपला शिवसेनेकडून बसलेला हा दुसरा धक्का आहे.

शिवसेनेला हेमेंद्र मेहता यांच्यामार्फत गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेमेंद्र मेहता हे बोरिवली पश्चिमम मतदारसंघामधून ३ वेळा आमदार राहिले आहेत. पण, यंदा विधानसभेत भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना तिकीट देण्यात आल्यानंतत हेमेंद्र मेहता यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज पुन्हा भाजपला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्य सेवेचे खापर फोडताना हे लक्षात घ्या की आरोग्यमंत्री शिवसेनेचेच होते – राम कदम

News Desk

काँग्रेसचे दिग्गज नेते चंद्रकांत रघुवंशी, संजय देवतळे यांच्या हाती शिवबंधन

News Desk

#Coronavirus : कोवीडसंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्या ! 

News Desk