HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी तर पवारांना बारमालकांची, सामान्य माणसा तुच तुझा वाली”

मुंबई | महाराष्ट्रातील कडक निर्बंधांची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. आता ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. तसं, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खोचक टीका केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तुच तुझा वाली’, अशा शब्दात उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावलाय आहे.

काय म्हणाले आहेत केशव उपाध्ये ट्विटमध्ये?

सामान्यमाणसा,नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, पवार साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली”, असं ट्वीट करत उपाध्ये यांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयावर टीका केली आहेे.

 

ब्रेक द चेनची नवी नियमावली

1) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 48 तास आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक

2) महाराष्ट्रातून घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्या RTPCR रिपोर्ट बंधनकारक असणार

3) परराज्यातून मालवाहूतक करणा-यांना RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह असावा तो 7 दिवस ग्राह्य धरणार

4) मालवाहतूक ट्रकमध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाचं प्रवेश

5) बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थनानिक आपत्ती व्यवस्थापनाने तो बंद करण्याचा निर्णय घ्यावा

6) दूधाचे कलेक्शन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार

7) एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रो मध्ये प्रवाशांची परवानगी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम मुझे कब तक रोकोगे?” -पंकजा मुंडे

News Desk

मुख्यमंत्री Vs राज्यपाल : वाचा सत्ताधारी आणि विरोधकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

News Desk

गोरखपूर मंदिर परिसरातील हल्ला प्रकरणी तपास सुरू, UP एटीएसची टीम मुंबईत दाखल

Aprna