HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजप सरकारच्या काळात दंगली होत नाही,” बोंडेंचं मलिकांच्या आरोपाला प्रत्युत्तर

मुंबई | भाजप सरकारच्या राज्यात दंगली होत नाही. महाविकास आघाडी सरकारसारख्या सेक्युलर सरकारच्या राज्यात दंगली होतात, कारण दंगलीला संरक्षण देण्याचं काम ही सरकार करतात, असा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. बोंडेंनी राज्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ऑडिओ क्लिप ट्वीट करत अमरावती हिंसाचारात पैसा पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. मलिकांच्या ऑडिओ क्लिपला बोंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

मी माझ्या ट्वीटर स्पेस केलेल्या संभाषणावर ठाम आहे. मी जे काही बोलतोय ते शुद्धीत बोलतो. मी कोणतीही हर्बल तंबाखू किंवा दारू पिऊन बोलत नाही. त्यामुळे मलिकांसारखे बेहोशीत वक्तव्य करत नाही. त्यामुळे जे बोलो त्यावर मी कायम आहे. भाजप सरकारच्या राज्यात दंगली होत नाही. महाविकास आघाडी सरकारसारख्या सेक्युलर सरकारच्या राज्यात दंगली होतात, कारण दंगलीला संरक्षण देण्याचं काम ही सरकार करतात, असे म्हणत बोंडेंनी मलिकांवर टीका केली.

गृहखात्यांकडून तपास करावा – बोंडे

पालक मंत्र्यांना ही अमरावतीची दंगल ही पूर्वनियोजत वाट असेल. तर त्यांनी त्यांच्या गृहखात्यांकडून तपास करावा, असा सल्ला बोंडेंनी पालक मंत्री यशोमती ठाकून यांना दिला आहे. बोंडे पुढे म्हणालं, आणि १२ नोव्हेंबरच्या आधीच व्हिडिओ फुजे आणि व्हाट्सअप चॅट आम्ही द्याला तयार आहोत.त्या सर्वांवर कारवाई करण्याची हिमत कोणती दाखवावी.

मलिकांनी ऑडिओ क्लिप ट्वीट करत बोंडेंवर केले आरोप

गोंध्रा दंगलीनंतर गुजरात किंवा अहमदाबादमध्ये दंगल झालीच नाही. याआधी अहमदाबादमध्ये दरवर्षी ही दंगल ठरलेली असायचीच. पण मोदी सरकार सत्तेत आल्यावर दंगल झालीच नाही. जेव्हा महाराष्ट्रात फडणवीसांचं सरकार आलं. तेव्हा दंगल झाली नाही. भाजपचं सरकार जिथे जिथे असते, तिथे तिथे दंगल घडवण्याची कोणी हिंमतच करत नाही. पण ज्या ठिकाणी सेक्युलर किंवा डाव्या विचारसरणीचं सरकार येतं, त्या ठिकाणी दंगली होतात. कारण अशा हिंसक कारवाया करणाऱ्यांना नेत्यांकडून संरक्षण मिळलं. याआधीच्या पाच वर्षांच्या सरकारमध्ये कोणत्याही संवेदनशील भागात दंगल झाली नाहीत.”

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझगाव डॉकमध्ये आयएनएस विशाखापट्टणमव युद्धनौकेवर भीषण आग

News Desk

अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा!

News Desk

‘कोरोना’च्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार !

swarit