HW News Marathi
महाराष्ट्र

“सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न!” – भुजबळ

मुंबई | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत असून त्यासमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करावा. येत्या ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले पुतळा उभारणीबाबत विद्यापीठातील प्रत्यक्ष जागेची आज पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ज्येष्ठ संशोधक हरी नरके, डॉ. संजय चाकणे, डॉ. महेश आबाळे, डॉ. सुधाकर जाधवर, प्रसनजीत फडणवीस, डॉ. मनोहर चासकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून लवकरात लवकर पुढील निर्णय घेण्यात येईल. विद्यापीठ प्रशासनाने पुतळा उभारणीबाबत आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घेण्यात याव्या त्याचप्रमाणे विद्यापीठ आवारात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी निधी मिळण्याकरिता तात्काळ सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरतो?”, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Aprna

जे आमच्यावर भूंकत आहेत त्यांच्या मनात भीती आहे!

News Desk

दालने घेतली पण कारभार हाती कधी घेणार?

News Desk