HW News Marathi
महाराष्ट्र

“कसं काय शेलार बरं हाय का?”; अज्ञातांकडून थेट भाजप कार्यालयासमोरच पोस्टरबाजी

मुंबई । भाजप नेते आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांमधील वाद दररोज नवी वळणं घेत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. कारण, काही अज्ञातांकडून मुंबईतील भाजप कार्यालयासमोर आशिष शेलारांचे आक्षेपार्ह पोस्टर्स लावण्यात आले आहेत. “कसं काय शेलार बरं हाय का?”; असं विचारत ह्या पोस्टरच्या माध्यमातून आशिष शेलारांवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली आहे. मात्र, हे पोस्टर्स नेमके कोणी लावले? हे अद्याप समजू शकलेले नाही.

मुख्य म्हणजे थेट भाजप कार्यालयासमोरच ही पोस्टरबाजी करण्यात आल्याने हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. आशिष शेलारांच्या फोटोचं विडंबन आणि किशोरी पेडणेकरांसोबत झालेल्या वादावरून टीका करत ह्या पोस्टरवर शेलारांवर टोकाची टीका करण्यात आली आहे. “काल म्हणे तुम्ही किशोरी ताईंचा अपमान केला”, असं म्हणत अज्ञातांकडून शेलारांना डिवचण्यात आलं आहे.

महापौर पेडणेकर आणि आशिष शेलारांमध्ये झालेल्या वादानंतर सातत्याने काही ना काही घडत आहे. अगदी दोनच दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकरांनाही एक धमकीचे पत्र आलं होतं. ज्यात त्यांच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी आणि अत्यंत अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता. परंतु, या पत्राचा आशिष शेलारांसोबत झालेल्या वादाशी कोणताही संबंध नसल्याचंही स्वतः पेडणेकरांनी सांगितलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

वरळी येथील बी. डी. डी. चाळीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात एक संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं. या कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला ज्यात अवघ्या ४ महिन्यांच्या बाळसह त्याच्या आई-वडिलांचाही समावेश होता. यावरून आक्रमक होत भाजप नेते आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि मुंबई महानरपालिकेवर निशाणा साधला. त्यावेळी शेलारांनी पेडणेकरांबाबत कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात पेटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्तव्यपथावर ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

Aprna

हायकोर्टात बुधवारी होणार मराठा आरक्षणावर सुनावणी

News Desk

राज्यात आज ७ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’

News Desk