रायगड | १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रोहा तालूक्यात तांबडी येथे घडली. या घटनेनंतर १२ तासात रायगड पोलीसांच्या ८ पथकांनी त्या नराधमाचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवलल्या. मात्र, या धक्कादायक घटनेनंतर या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांनी दखल घेतली नसल्याची नाराजी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.
‘रोह्याच्या अल्पवयीन मुलीच्या घटनेची एका शब्दाने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी दखल घेतलेली पाहण्यात आली नाही. किंवा, कुटुंबाला धीराचे २ शब्द नाहीत. महिला सुरक्षेवर भाषण करताना न थकणारे नेते आता कुठे गायब झाले आहेत. भाषणं खुप झाली मुख्यमंत्री महोदय शिवरायांचा महाराष्ट्र आता तुमच्या कृतीतही दिसू द्यात, असे चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री या प्रकाराची दखल घेतील का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
रोहाच्या अल्पवयीन मुलीच्या घटनेची एका शब्दाने मुख्यमंत्री,गृहमंत्रींनी दखल घेतलेली पहाण्यात नाही कि कुटुंबाला धीराचे २ शब्द नाहीत.महिला सुरक्षेवर भाषण करतांना न थकणारे नेते आता कुठे गायब झालेत.भाषणं खुप झाली मुख्यमंत्री महोदय शिवरायांचा महाराष्ट्र आता तुमच्या कृतीतही दिसूद्यात ! pic.twitter.com/RfNz8FJGoe
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 28, 2020
काय घडले होते ?
रोहा तालुक्यातील तांबडी येथील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली. रविवारी (२६ जुलै) संध्याकाळी पावणेसहाच्या दरम्यान मृत तरुणी शेतात काम करणाऱ्या आजोबांना आणण्यासाठी गेली होती. मात्र, ८ वाजून गेल्यानंतरही ती घरी न आल्याने आई, वडील आणि घरातील मंडळींनी शोधाशोध सुरु केली.
यावेळी शेतावर जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना स्कूटी उभी असलेली दिली. मात्र, मुलगी दिसली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी आजूबाजूला शोध घेतला असता, एका मोठ्या दगडावर मुलगी विवस्त्र आणि मृत असल्याचे आढळले. यानंतर लगेचच कुटुंबियांनी रोहा पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. या घटनेनंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हा अधीक्षक सचिन गुजांळ, रोहा DYSP किरण सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी फॉरन्सिक लॅब आणि श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाजवळ काही भौतिक पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर त्या मृत मुलीचे शव जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
या गुन्ह्यांच्या तपासात पारंगत असलेल्या अधिकाऱ्यांची आठ पथके बनवण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी आजूबाजूच्या गावातील संशयितांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी एका आरोपीने गुन्हा केल्याची कबूली दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.