HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांची ‘टरबूज्या’ म्हणत उडवली टर तर गिरीश महाराजनांही रुग्णांच्या नातेवाईकांनी सुनावले बोल

नाशिक | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (३० एप्रिल) नाशिक दौरा केला. यावेळी नाशिकमध्ये एका रुग्णालयात गेले असता फडणवीसांना नातेवाईकांच्या संतापला सामोरे जावे लागले.भाजपच्या पदाधिकार्‍यांनी हॉस्पिटल पाहणीच्या दौर्‍यांची मालिकाच सुरु केल्याने आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचाही संताप अनावर होत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या पाहणी केली.

देवेंद्र फडणवीस रुग्णालयात येताच काहींनी ‘टरबुज्या’ असे हिणवत टर त्यांची उडवली. या दरम्यान, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना एका रुग्णाच्या नातेवाईकांचे खडे बोल ऐकावे लागले. रुग्णाच्या नातेवाईकाचा संताप बघून फडणवीस हे मुकाट्याने त्यांच्या वाहनात जाऊन बसले. याच दौऱ्यात रुग्णांनी बिटको हॉस्पिटलमधील अव्यवस्थेचा पाढा देखील फडणवीस यांच्यासमोर वाचला.

एकीकडे नाशिकमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना नेत्यांनी अशा प्रकारची गर्दी जमवणे योग्य आहे का? असा खडा सवाल रूग्णालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला.तसेच,अनेकांनी “तुम्ही येथून माघारी जा” असेही नारे दिले.याच दरम्यान,महाजन आणि नागरिकांमध्ये चांगलीच खंडाजंगी झालेली देखील पाहण्यास मिळाली.या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार,नाशिक येथे बिटको रूग्णालयात देवेंद्र फडणवीस,गिरीष महाजन आणि प्रविण दरेकर हे पाहणी दौरा करण्यासाठी आले होते.याच दरम्यान,या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.त्यामुळे,सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला.यावरून,नागरिकांनी रोष व्यक्त करत गिरीष महाजन यांना खडे बोल सुनावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामभक्तांना भूमिपूजन कसे पाहता येणार? मुख्यमंत्र्यांनी सुचवला पर्याय

News Desk

डिझेल परताव्याचे १२ कोटी वितरित करण्यास वित्त विभागाची मान्यता! – अस्लम शेख

Aprna

शरद पवारांच्या भेटीनंतर गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चेला उधाण

Manasi Devkar