HW News Marathi
महाराष्ट्र

मे महिन्यात ‘एप्रिल फूल’!, पेट्रोल-डिझेल दरकपातीवरून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई | केंद्र सरकारने शनिवारी (21 मे) पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने काल (रविवार 22 मे) पासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. मात्र, यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, असा दावा फडणवीसांनी केला आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की “महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो.”

“त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला”, असे फडणवीसांनी म्हंटले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य! – चंद्रकांत पाटील

Aprna

शरद पोंक्षे, राष्ट्रवादी आणि राजकारण !

News Desk

महाराष्ट्रात आणीबाणी लावा! महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याने लिहिलं चक्क मोदींना पत्र

News Desk