HW News Marathi
महाराष्ट्र

“आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा”, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर

जळगाव | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काल पुन्हा एकदा लवकरच सीडी लावणार असल्याचं विधान केलं आहे. या विधानावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे. आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा, असं आव्हानच गिरीश महाजन यांनी खडसेंना दिलं आहे. मात्र, महाजन यांच्या या विधानावर आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. भाजपनेच खडसेंच्या मागे ईडी लावल्याचं महाजन यांनी कबूल केल्याचीही जोरदार चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत.

आमची ईडी लागली आता तुमची सीडी लावा

सीडीचा विषय आता जुना झाला असून आमची ईडी लागली आता तुमची सीडी लावा, असा टोमणा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांचा वीज पुरवठा खंडित करणे चुकीचे आहे. महावितरणच्या कारभाराविरुद्ध एखादे आंदोलन उभारावे लागेल. तिसरी लाट येऊ नये यासाठी आपण प्रार्थना करूया. सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. एकीकडे सर्व उघडे ठेवणे आणि दुसरीकडे मंदिरे बंद ठेवणे हे योग्य नाही, असेही महाजन म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

‘भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला कळले तरी की माझी चौकशी का सुरू आहे. पण अशा रितीने त्रास देणे योग्य नाही. जावयाला तरी असा त्रास द्यायला नको होता.’

‘माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही. त्यांनी आयुष्यात राजकारणात काहीही केलेले नाही. तो गेली 20 वर्षे ब्रिटनमध्ये नोकरी करतोय. पण त्यांना विनाकारण छळले जात आहे. त्यांचा या प्रकरणात व्यवहार फक्त 2 कोटींचा आहे. त्यासाठी देशाची सर्वोच्च यंत्रणा ईडी चौकशी करतेय.’

थाभाऊने पक्ष बदलला म्हणून तुम्ही कितीही छळ करा, हा काही पहिल्यांदा घडलेला प्रकार नाही. मी आता स्वतः अशी मानसिकता करून घेतली आहे की जे होईल ते होईल. मी काही केलेले नाही, म्हणून काय होईल ते पाहू. नाथाभाऊ मजबूत माणूस आहे. तुम्हाला किती बदनाम करायचे तितके करा, पण मी काही झुकणारा किंवा घाबरणारा नाही.’

‘चलते रहना’

‘ईडी माझ्या मागे लागली म्हणजे माझा चेहरापण पडणारा नाही. ‘चलते रहना’ अशीच माझी मानसिकता. यांनी कितीही बदनामी केली तरी नाथाभाऊ कसा आहे, हे जनतेला 40 वर्षांत माहिती नाही का? ‘जाहिल यू ही बदनाम है, हमको गम से क्या काम है, ये मुस्कुराती जिंदगी जिंदादिली का नाम है’, असा शेर म्हणत खडसेंनी भाजपला जोरदार टोला लगावला.

ज्याने भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केला आहे, त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी

‘ज्याने भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केला आहे, त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी, या मताचा मी आहे. पण ज्या माणसाच्या चार वेळा चौकश्या झाल्या, सीबीआय, इन्कम टॅक्सने केलेल्या चौकशीत काहीही तथ्य निघाले नाही. तरी नंतर अशा पद्धतीने छळणे योग्य नाही. हे निव्वळ राजकारण आहे, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे.’

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिर पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकार नियमावली तयार करणार – प्रकाश आंबेडकर

News Desk

कोणत्याही कुरबुरी न करता बदल्यांचे पत्ते पिसले !

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या जवळ जाणार का? जयंत पाटील म्हणतात…

News Desk