HW News Marathi
महाराष्ट्र

INS विक्रांत प्रकरणी नील सोमय्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई | आयएनएस विक्रांत मदतनिधी गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या दिलासा मिळाला आहे. नील सोमय्या यांना तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. नील सोमय्यांला २५ ते २८ एप्रिलदरम्यान चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. आणि नील सोमय्यांना चौकशीला हजर राहून तपासांत सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. 

काय आहे प्रकरण?

२०१३-१४ किंवा २०१४-१५ मध्ये किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी सामान्य जनतेकडून वर्गणी गोळा केली होती. साधारण ५८ कोटी रुपये जमा केल्याचा दावा राऊतांनी केला असून ही रक्कम सोमय्यांनी लाटली असंही त्यांनी आपल्या आरोपांमध्ये म्हंटलेलं आहे. जनतेकडून गोळा केलेले पैसे सोमय्यांनी राज्यपालांकडे जमा केले नाहीत व हे पैसे त्यांनी आपल्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वापरले, असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोमय्यांनी देशद्रोह केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा – धनंजय मुंडे

News Desk

देशमुखांना हटवण्याचे बळ मुख्यमंत्र्यांमध्ये नाही!, भाजपची बोचरी टीका

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी ‘या’ निर्णयावर मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन

swarit