HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंना दिलासा! १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई | शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजपचे नेते नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आता नितेश राणेंचा जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (४ फेब्रुवारी) पोलीस कोठडी संपली होती. यानंतर आज कणकवली दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता नितेश राणेंचा जामीन अर्जासाठी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

दरम्यान, नितेश राणेंच्या दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या भाग म्हणून पोलिसांनी गोव्यात घेऊन गेले होते. राकेश परब आणि नितेश राणे यांचीही समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली आहे. गोव्यानंतर आता पुण्याला चौकशीसाठी न्यायचे असून अजून तपास करायाचा आहे. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पण, न्यायालयाने नितेश राणेंना अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राणे हे सिंधुदुर्ग सत्र न्यायालयासमोर शरण जाण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने राणेंना अटक पूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, जिल्हा सत्र न्यायालयाने देखील त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. यानंतर राणेंना अटकेची टाकती तलवार होती. राणेंनी २ फेब्रुवारी कणकवली दिवानी न्यायालयासमोर शरण आले.

नेमके काय आहे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. तसेच या प्रकरणातील एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान नितेश राणेंचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड ?

News Desk

“ना डरुंगी ना झुकुंगी”, मुंबईत येण्याआधी कंगनाचे ट्विट

News Desk

मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्या वाढवा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्रातून आवाहन

News Desk