HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांत प्रकरणातील २० ऑगस्टला केलेले ट्विट आज खरे ठरले, नितेश राणेंचा खोचक टोला

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरण तपासावरून सुरु झालेल्या राजकारणात आता अनेक नव्या बाबी समोर येऊ लागल्या आहेत. सीबीआय तपासामुळे महाविकास आघाडीला दणका बसल्याचे विरोधकांनी आरोप केले. दरम्यान, सीबीआय चौकशीनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या लेखातून हे प्रकरण मराठी, महाराष्ट्राची अस्मिता , मराठी माणूस या विषयांशी जोडून भावनिक केला जाईल असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट द्वारे केला होता.

आता नितेश राणे यांनी यासंदर्भात आणखी एक ट्विट केले असून सद्याची परिस्थिती बघता २० ऑगस्टला केलेले ट्विट आज खरे ठरत असल्याचे म्हणत शिवसेनेसह खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. “Tweeting again! So true २० ऑगस्टला केलेले ट्विट आज खरे ठरले. आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेख चे विषय : 1.)मराठी अस्मिता 2.)महाराष्ट्र धर्म 3.)मराठी माणूस. Night life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही.. तेव्हा Dino, Jacqueline, disha पाहिजे असतात.. वाट लागल्यावर लगेच मराठी माणूस !” असा निशाणा नितेश राणे यांनी साधला आहे.

https://www.facebook.com/471924039620091/posts/2355159581296518/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला लोकसभा निवडणुकीची चिंता नाही | शरद पवार

swarit

पुण्याच्या उद्योजकाच्या पुढाकारातून सिंगापूरहून येणार ३५०० व्हेंटीलेटर्स

News Desk

CBI, ED काहीही असू द्या, काहीही झालं तरी सरकार, आमदार, नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत – संजय राऊत  

News Desk