HW News Marathi
महाराष्ट्र

या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील, पंकजांचा अप्रत्यक्ष धनंजय मुंडेंना टोला

मुंबई | उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना सीबीआयकडून प्राथमिक चौकशी करण्यात येणार असल्यामुळे गृहमंत्रिपदावर असणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. यावरुन आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्या पंकडा मुंडे यांनीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर सुचक ट्विट केले आहे.

काय आहे पंकजा मुंडे यांचं ट्विट?

गृहमंत्री यांचा राजीनामा’ देर आये पर दुरुस्त नहीं आये ‘, या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल.

 

दरम्यान, कुठेतरी पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री तथा पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यासाठी आहे. रेणू शर्मा यांनी बलात्काराचा गंभीर आरोप करुनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नव्हता. त्यामुळे आता अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर शरद पवार काय म्हणाले होते?

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांत तथ्य़ नसल्याने अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार नाही असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पवारांनी पुर्णविराम दिला होता. तसेच, परमबीर सिंग यांनी दिलेल्या पत्राबद्दली त्यांनी भाष्य केले आहे. गृहमंत्री फेब्रुवारीच्या संबंध महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असं सिंग कशाच्या आधारावर म्हणतात? असा सवाल करतानाच वाझे-देशमुख भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा शरद पवार यांनी केला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रमच विशद केला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रंही त्यांनी सादर केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महागाई आवरती घ्या… महागाईवर काहीतरी बोला… अन्यथा पुढचा काळ कठीण! – जितेंद्र आव्हाड

Aprna

‘मुंबई मा जलेबी ने फाफडा’, महापालिकेच्या निवडणुकीसाठी सेनेची गुजराती बांधवांना साद

News Desk

हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे । जयंत पाटील

News Desk