HW News Marathi
महाराष्ट्र

“मला बदनाम करण्यासाठी हे केलं असावं”, रक्षा खडसे यांची ‘त्या’ प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया 

मुंबई | भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे समोर आले. यानंतर या प्रकरणाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत भाजपला दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला होता. यानंतर काही तासांमध्येच ही चुक दुरुस्त करण्यात आली आहे. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आता रक्षा खडसेंच्या नावाखाली त्यांचा योग्य मतदारसंघ लिहिण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाबाबत खासदार रक्षा खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एबीपी माझाशी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, ‘हे सर्व मला बदनाम करण्यासाठी केलं आहे. ‘

काय म्हणाल्या रक्षा खडसे?

‘ज्यावेळेस मला याबाबत कळालं, त्यावेळेस मी वेबसाईट चेक केली. तर वेबसाईटवर असं काहीही नव्हतं. ज्या लोकांकडून हे व्हायरल झालेलं आहे, ते सेव्ह महाराष्ट्र फॉर्म बीजेपी या पेजवरून या गोष्टी व्हायरल होत आहे, असं मला वाटतंय. मला बदनाम करण्यासाठी हे फोटोशॉप करून केलं असेल अशी माझी शंका आहे. याबाबत मी रात्री सहाय्यक पोलीस आयुक्तांना कळवलं आहे. तसंच पक्षाला देखील सांगितलं आहे. आता याबाबत पुढे काय कारवाई होईल हे कळेल,’ असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

पुढे त्या असंही म्हणाल्या की, ‘सोशल मीडियाचं जग एवढं मोठं झालेलं आहे आणि एवढं तंत्रज्ञान प्रगत झालं आहे. त्यामुळे एखादी खोटी गोष्ट पण खरी कशी करता येते, याच्या देखील यंत्रणा आपल्याकडे आहे. मला असं वाटतं की, या सर्व गोष्टी फोटोशॉपच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. कारण ज्या पेजवरून या सर्व गोष्टी व्हायरल होत आहेत, मुळात ही गोष्टी व्हायरल करण्यासारखी नाही आहे. पण त्यांनी ती व्हायरल केली आहे. मला बदनाम करण्यासाठी हे केलं असावं.’ दरम्यान, राजकीय वर्तृळात पुढे काय वादळ उठणार, राष्ट्रवादीचे नेते आणि रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यावर काही बोलणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाचा मोर्चा थेट हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर धडकणार

News Desk

पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, सामानातून जोरदार टीका

News Desk

कोल्हापूरातील पंचगंगेच्या पातळीत २ फुटांनी घट

News Desk