HW News Marathi
देश / विदेश

उद्धव ठाकरेंचे ‘हे’ बळ पुढे त्यांच्याच कामी येईल, मुनगंटीवारांचा टोला 

मुंबई | “‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’ हा फिल्मी डायलॉग आहे. हे वाक्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याच मनातील ‘द्वंद्व’ आहे. तब्बल ३० वर्षे जुन्या मित्राला बाजूला करत वैचारिक मतभिन्नता असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने ही हिंमत आता त्यांच्याच कामी येणार आहे”, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अनलॉक मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. याच टीकेला आता भाजपच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.

सरकारमधलीच माणसे सरकार पाडण्यास कारणीभूत असतात !

“‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’ हा फिल्मी डायलॉग उद्धव ठाकरेंच्याच मनातील ‘द्वंद्व’ आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा कायमच काँग्रेसला सतत कडवा विरोध राहिलेला आहे. मात्र, उद्धव ठाकरे सध्या त्यांच्याचसोबत सत्तेत बसले असल्याने येत्या काळात हे बळ त्यांच्याच कामी येवो अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. कोणतेही सरकार कधीही बाहेरच्या कुठल्याही माणसांनी पडत नाही. सरकारमधलीच माणसे ते पाडण्यास कारणीभूत असतात. मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांची उदाहरणे आपल्याकडे आहेत”, असे सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी जरी जनादेशाचा अवमान केला असला तरीही …!

“भाजपने कधी आपल्या ३० वर्षे जुन्या शिवसेनेसारख्या मित्राला आणि त्यांच्या नेतृत्त्वाला कमी लेखले नव्हते. मग उद्धव ठाकरेंनी उत्तम काम केले तर इतरांच्या पोटात का दुखेल ? उद्धव ठाकरे हे आमचे मित्र आहेतच. त्यांनी जरी जनादेशाचा अवमान केला असला तरीही आम्ही त्यांचे महत्त्व कमी करणार नाही. रकारच्या कामकाजातील उणिवा सांगणे म्हणजे कमी लेखणे नव्हे. उद्धव ठाकरेंच्या हातून पुढेही उत्तम काम व्हावे हीच सदिच्छा”, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत डीएसपी अमन ठाकूर शहीद

News Desk

मिशन गगनयानमुळे रोजगार निर्मितीत मोठी वाढ 

swarit

कोरोनापासून वाचण्यासाठी पंतप्रधान करणार जनआंदोलन!

News Desk