HW News Marathi
महाराष्ट्र

मोदी, शहा यांना समजण्यासाठी राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील !

मुंबई | ‘अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील,’ अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्यावर केली. शेलार पुढे म्हणाले की, सत्तावाटपाबाबत अमित शहा यांनी जे सांगितले तेच सत्य आहे. त्यामुळे कुणाची अडचण होत असेल तर त्याला आमचा नाइलाज आहे, असे विधान करत शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच शेलार यांनी आज (१५ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

शेलार म्हटले की, शिवसेनेच मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी? हे जनतेला माहित आहे, असात चिमटाही शिवसेनेला काढला. तसेच यासंदर्भात बोलातना शेलार म्हणाले की, मोदी आणि ठाकरेंमध्ये विसंवाद करणारे दररोज टीव्हीवर येतात, हे कोण आहे जनतेला दिसते, असा आरोप त्यांनी राऊतांवर केला आहे. तसेच वयाबरोबर परिपक्तवता वाढावी, संजय राऊतांनी शेलार यांच्याकडून वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिला आहेत. ‘मी पुन्हा येईन’ असे सारखे म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास राऊतांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले की, “खऱ्या अर्थाने पाहिले तर भाजप आणि इतर पक्षाचे नेते ‘मातोश्री’वर आदरपोटी जायचे. मात्र आज सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेचे नेते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकीसाठी जात आहेत. आधी मातोश्रीहून कुणी राज ठाकरे यांना सुद्धा भेटायला जात नव्हते. मात्र, आता माणिकराव ठाकरे यांना भेटायला सुद्धा जात आहेत, असे म्हणत शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ‘मी पुन्हा येईन’ असे सारखे म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने धोका कमी’, मदत व पुनर्वसन मंत्र्यांची माहिती…!

News Desk

चर्चा योग्य दिशेने सुरू, निर्णय लवकरच कळेल !

News Desk

राज्यसरकाचा पाठिंबा काढणार शिवसेना

News Desk