HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील,जाऊ द्या ना ताई!” शेलारांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

मुंबई | भाजप नेते गणेश नाईक यांच्या भाषणातील एका विधानाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. एसआयटी चौकशीच करायची तर बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरपासून ते पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत अनेक विषय आहेत. अशा ट्रकभर चौकश्या कराव्या लागतील, जाऊ द्या ना ताई, असं म्हणंत आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करून या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. गणेश नाईक यांच्या भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीर, बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे… आणि पूजा चव्हाणचा मृत्यू… अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय!, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असे वक्तव्य करणारे भाजपचे नेते गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे केली. वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्‌घाटन त्यांच्या पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी त्यांनी केली.

“गणेश नाईक पक्षात असताना त्यांचा पक्षात कसा सन्मान होत होता हे सांगताना ब्लँक पेपरवर सही होऊन नवी मुंबईत उमेदवारांची नावं टाकली जात होती. नाईकांच्या घरात अन्न खाल्लं आहे. त्यामुळे अन्नाशी गद्दारी कधीच नाही. ते कसेही वागले तरी,” असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्य़ांसाठी 90 कोटींचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर,

News Desk

राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा, मराठी माणसाला डिवचू नका!

News Desk

लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर विश्वविक्रमी रस्ता बांधकाम

Aprna