HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांचा नातू अपरिपक्व नाही हे वारंवार सिद्ध होतंय!

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने त्या नैराश्यातून बीड जिल्ह्यातील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. यावरुन अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या मराठा आरक्षण प्रश्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत. त्यांच्या या निर्णयाला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पाठिंबा दिला आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत संयत आणि योग्य आहे. पवारांचा नातू अपरिपक्व नाही हे वारंवार सिद्ध होत आहे, असे ट्विट भातखळकर यांनी दिले आहे.

काय केले होते पार्थ पवारांनी ट्विट?

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी.

विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आलं आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ‘विवेक’साठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंच्या वरळी कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी, ३ आयोजकांसह ४२ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

अँस्ट्राँसिटी जनजागरण परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन 

News Desk

महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची दिली धमकी

News Desk