मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दलित बांधवाचे पाय धुतले यांचा संदर्भ देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यानंतर भाजप आमदार राम सातपुते यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दित म्हणाले, “राऊत आणि शिवसेना उत्तर प्रदेशामध्ये भाजपच्या कामने सर्व जाती आणि धर्मातील समाजाच्या घटकांकडून विधानसभा निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळाले. दलित लोकांच्या संबंधित समस्यांबद्दल भाजपला त्यांनी शिवकवण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.
सातपुते म्हणाले की, भाजप हा असा पक्ष आहे जो कधीही लोकांशी खोटे बोलत नाही, केवळ लोकांना दाखवण्यासाठी काही करत नाही, भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सर्वांना समान संधी दिली आहे आणि त्यामुळेच भाजपला उत्तर प्रदेशात चांगला पाठिंबा मिळत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
“मला हे सांगायलाच हवे की संजय राऊत यांच्या पक्षाकडे जितके आमदार आहेत. त्यापेक्षा जास्त दलित बांधव खासदार भाजपकडे आहेत. म्हणून आम्ही जे प्रचार करतो तेच करतो.” सातपुते म्हणाले. पुढे ते पुढे म्हणाले, “राऊत यांनी केवळ काँग्रेसला खूश करण्यासाठी काही करू नये, मी संजय राऊत यांना खुले आव्हान देतो, त्यांनी आपल्या पक्षाने दलित उमेदवारांना किती प्रतिनिधित्व दिले आहे ते दाखवावे?”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.