HW News Marathi
महाराष्ट्र

“पडळकर, खोत कमी पडले!”; ST कर्मचाऱ्यांबाबत Anil Parab यांचं विधान

मुंबई। “भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही कदाचित एसटी कर्मचाऱ्यांना समजावण्यात कमी पडले असतील”, असा टोला लगावत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दोघांना नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहे. परब पुढे म्हणाले, “नाही तर एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील.मात्र, सर्वांसाठी चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन परबांनी आज (१६ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना केले आहे.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी दिवाळीपासून संपावर गेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांशी वारंवार चर्चा करून ही अद्याप तोडगा निघालेला नाही. सध्या एसटी कर्मचारी हे आझाद मैदानावर आंदोलनावर बसले आहेत. एसटी कमर्चाऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची आज संध्याकाळी ५ वाजता बैठक होणार आहे

हे सरकार काळे झेंडे दाखविण्याच्या लायकीचं। पडळकर

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, यानंतर कर्मचाऱ्यांना काय देता येईल, किंवा नाही या संदर्भात चर्चा करावी, असा सल्ला ही पडळकरांनी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आणि या सरकारला काळ्या पायाचे सरकार आहे, अशा शब्दात
पडळकरांनी सरकारवर टीका केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘MPSC ला जागा देण्यास २ वर्षे’, रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

News Desk

संतापजनक! रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून अंबाजोगाईत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

News Desk

नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपध्दत योग्य नाही!

News Desk