HW News Marathi
महाराष्ट्र

“महाविकास आघाडी सरकार बहुजनांचे सरकार,” पडळकरांची राऊतांवर टीका

मुंबई | जनाब संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचे सरकार आहे, असा भयानक फसवा दावा आपण आपल्या पुण्यातल्या सभेत केला, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पडळकरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महाविकासआघाडी सरकावर व्हिडिओद्वारे निशाणा साधला. पडळकर पुढे म्हणाले, “कदाचित आम्हा बहुजनांना आपण पण आपल्या सारखाच शकुनी काकाचा हुजऱ्या समजत असाल. तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? गेल्या दोन वर्षात एक हजाराच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का? शेतात पीके असताना शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडणी केली, ते शेतकरी बहुजन नाहीत का?, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

पडळकर म्हणाले, “आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे एसी,एसटी ओबीसी,भटके विमुक्त अ,ब,क,ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधील आरक्षण मातीत घालवले गेले, ते कोणत्या तुमच्या बहुजन प्रेमातून आले होते? धनगर आरक्षणासंबंधी एक साधी बैठकही तुम्ही अडीच वर्षात करू शकला नाहीत. हे तुमचे कोणत बहुजन धोरणे होते? सरकार स्थापनेच्या वेळेस तुम्ही प्रस्थापितांसोबत सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. पण जेंव्हा आम्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयचे तीन निर्णय आमच्या विरोधात येतात.”

अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला

 न्यायालयाने सांगून सुद्धा तुम्ही अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता, अशी टीका पडळकरांनी केली. पडळकर पुढे म्हणाले, “मुळात तुमची इच्छा हीच आहे की बहुजन पोरांनी तुमच्या सारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्याच उचलायच्या. बहुजनांचं दैवत असलेल्या  विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवता. हे बहुजन समाज विसरलेला नाही.आपल्या बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबांडाचा तुम्ही रोज सकाळी उठून उधो उधो करता. हे बहुजनांचे हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही, कारण त्या करिता स्वाभिमान असावा लागतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शौमिका महाडिकांची गोकुळ दूध संघाच्या चिलिंग सेंटरच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर!

News Desk

देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी दुर्मिळ नाणी जपणे आवश्यक! – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Aprna

“तो आवाज माझ्या मुलाचा नाही!”,अरूण राठोडच्या आईचा खुलासा…

News Desk