HW News Marathi
महाराष्ट्र

“अहमदनगर’ जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करा”, पडळकरांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

मुंबई | ‘अहमदनगर’ जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रातून केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन घ्या, अशी मागणी पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना आज (२ जून) लिहिलेल्या पत्रातून केली आहे. पडळकरांनी मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 

पडळकर म्हणाले, “हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेंव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती,मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे. त्यामुळे आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा? ‘अहिल्यानगर’ नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे लक्षात ठेवा.”

“नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॅामब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवारांनी हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो,” असे म्हणत पवारांवर टीका केली. 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सब का विश्वास’ हे मोदींचे ढोंग आहे का? काँग्रेसचा भाजपा नेत्यांना सवाल

News Desk

झोटिंग समितीच्या गहाळ अहवालावरून उपमुख्यमंत्र्यांचा सवाल

News Desk

“महाराष्ट्राला केंद्राकडून मदत नक्कीच मिळेल!”, फडणवीस आणि राऊत यांच्यात वाद पेटला

News Desk