HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत आणि नवाब मालिकांना शाहरुखने भाड्याने घेतलंय!, नितेश राणेंची बोचरी टीका

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. एनसीबीकडून एकीकडे आर्यन खान आणि या ड्रग्ज प्रकरणाची कसून चौकशी सुरु असताना दुसरीकडे महाविकासआघाडीकडून या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जातं आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावरून भाजपवर टीका करणारं एक वक्तव्य केलं होतं ज्याला आता भाजप आमदार नितेश राणेंनी बोचरं प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे विचारा. कारण तो माणूस शुद्धीत बोलत नाही हे समजलं आहे”, असं नितेश राणे म्हणाले.

संजय राऊत काहीच दिवसांपूर्वी म्हणाले होते की, “एनसीबी पकडलेला गांजा भाजपकडे देते आणि त्या नशेत भाजप नेते उलटसुलट वक्तव्य करतात”. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक देखील वारंवार यावरून आक्रमक झालेले दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, नितेश राणे यांनी देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारादरम्यान राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “शाहरुख खानकडे इतका पैसा झाला आहे की त्यांनी संजय राऊत आणि नवाब मलिक यांना भाड्याने घेतलं आहे”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

“महाराष्ट्रात इतर विषय संपले का?”

महाविकास आघाडीचे नेते सातत्याने गांजा आणि आर्यन खानविषयी वक्तव्य करत असल्याचं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांच्या या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. “महाराष्ट्रात इतर विषय संपले का? महाविकास आघाडी सातत्यानं गांज्या आणि ड्रग्जबद्दल बोलत आहेत. महाराष्ट्रात रोजगार, शेतकरी आणि इतर प्रश्न देखील आहेत. त्यावर सरकार बोलायला तयार नाही”, असा सवालही आमदार नितेश राणे यांनी केला.

निश्चितच या ड्रग्ज प्रकरणाने राज्यातील राजकारण पेटलं असून दररोज नवे दवे-खुलासे होत आहेत. त्यामुळे, पुढे हे सर्व प्रकरण नेमकं काय वळण घेणार याकडे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचे निकटवर्तीय अॅड एकनाथराव साळवे यांचं निधन

News Desk

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी ईडीने कारवाई करू नये, सरनाईकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

News Desk