HW News Marathi
Covid-19

कुंभकर्णी निद्रित अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले !

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांपासून बंद असणारी धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यात यावीत ही मागणी गेले कित्येक दिवस जोर धरत होती. विरोधक आणि धार्मिक संघटनांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यायला सुरुवात केल्यानंतर अखेर राज्य सरकारने पाडव्यापासून राज्यातील धार्मिक स्थळांना पाडव्यापासून उघडण्यास राज्य पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयानंतर याच मुद्द्यावर आक्रमक राहिलेल्या भाजपच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

भाजप आमदार राम कदम यांनी सरकारच्या निर्णयानंतर ट्विट करत म्हटले की, “कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले डरपोक सरकारचा मोठा पराभव! जनतेचा अखेर मोठा विजय!” दरम्यान, राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी आतापर्यंत भाजपकडून सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर, शनिवारी (१४ नोव्हेंबर) मुख्यमंत्र्यांनी धार्मिक स्थळे खुली करण्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतरही
भाजपकडून पुन्हा सरकारवर टीका होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात ४९,९३१ नवे रुग्ण आढळले

News Desk

महाराष्ट्र दिनी ‘शिवभोजन थाळी’ने ओलांडला ४ कोटींचा टप्पा !

News Desk

#Coronavirus : दिल्लीतील तब्लिगिंची कोरोनावर मात

News Desk