बीड । बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंची सत्ता असताना त्यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचं उद्घाटन आजही आम्ही करतो. एवढंच काय आजचे सत्ताधारीही त्याच काळात मंजूर झालेल्या विकास कामांचं खऱ्या अर्थाने उद्घाटन करत फिरत असल्याची खरमरीत टीका जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी केली आहे. विकास काम तथा जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या मनात नियत चांगली असली पाहिजे. जिल्ह्यातील जनतेवर कोणतंही संकट आलं कि आम्ही धावून येतो सरकारने आतिवृष्टीची तुटपुंजी मदत जाहिर केली पण पदरात पडूस्तर काय खरं? हे सांगतांना आमच्या सत्ता काळात लोकांना भरीव पैसे मिळत होते अशी आठवणही यावेळी प्रीतम मुंडेंनी करून दिली.
पुढे बोलतांना खासदार प्रीतम मुंडेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. “सामान्य जनतेची कामं करण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या मनात नियत असावी लागते. बीड जिल्ह्यात आज विकास कामासाठी नवी दमडी मिळत नाही. पंकजा मुंडेंच्या काळात मंजुर झालेल्या कामाचं उद्घाटन आम्ही करतो? पण सत्ताधारीसुद्धा करतात”, अशी खरमरीत टिका प्रीतम मुंडे यांनी केली आहे.
“शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी द्यायला हवेत”
“गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा मिळत नाही कुठलंही अनुदान मिळत नाही. अतिवृष्टीचं संकट आलेलं असताना आम्ही भगिनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचं काम केलं. सरकार दरबारी संघर्ष करताना मोर्चे काढले, धरणं धरलं पण सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली असली तरी पदरात पडेपर्यंत काय खरं? सरकारने खरं तर ५० हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना द्यायला हवेत”, असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या. बीड जिल्ह्यात काम करत असताना आम्ही केवळ विकासाच राजकारण करतो, लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याच्या भूमिकेत आम्ही असतो असंही यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या.
मोदींमुळे आपण कोरोनाचा सामना सक्षमपणे केला!
पुढे केंद्र सरकारचं कौतुक करताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, कोरोनासारख्या संकटाचा सामना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्षमपणे केला म्हणून या संकटापासून आपली सुटका होत आहे. तरी पण ज्यांनी लस घेतलेली नाही अशा लोकांनी लसी करून लसीकरण करून घेण्याचं आवाहनही प्रीतम मुंडेंनी केलं आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला . त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लस्सी उपलब्ध झाल्याचं देखील खासदार प्रीतम मुंडेंनी सांगितलं.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.