HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

भाजपकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची ऑफर ?

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपची बी टीम म्हणून  सातत्याने टीका होत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांना भाजपकडून मोठी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी देण्याची ऑफर देण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रपती कोट्यातून कायदे तज्ज्ञ म्हणून आंबेडकरांना राज्यसभेवर पाठविण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवून वंचित मते आकर्षित करण्याचा भाजप प्रयत्न केला जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आंबेडकरांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्याला चर्चा करण्याच्या सूचना दिल्लीतून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे भाजपचे नेते लवकरच आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली  आहे.

आंबेडकरांना आघाडीत घेण्यासाठी कॉंग्रेसकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या निर्देशानुसार माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील या नेत्यांना ३ जुलै रोजी आम्ही प्रकाश आंबेडकरांशी भेट घेऊन आघाडीत येण्याचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती खुद्द  ठाकरेंनी दिली. त्यामुळे “वंचित”ला आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसला मोठी घाई झाली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र जर भाजपने आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवले तर कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Related posts

‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजपकडून प्रकाशन..

Arati More

राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तर मुंबईतील ३७४ जणांना डिस्चार्ज | राजेश टोपे

News Desk

मनसेचा रेल्वे प्रवास’, जनतेच्या हितासाठी करणार आंदोलन!

News Desk