HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरुन रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख केला दुरुस्त!

मुंबई | राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या अधिकृत मराठी वेबसाईटवर भाजप खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. एका महिला खासदाराबद्दल असभ्य भाषेत चुकीचा उल्लेख केल्यामुळे खळबळ उडाली होती. यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. त्यानंतर आता काही तासांमध्येच ही चुक सुधारण्यात आली आहे. भाजपने अधिकृत वेबसाईटवर तातडीने आपली चूक सुधारली आहे. हिंदी भाषेच्या गुगल ट्रान्सलेटमुळे हा घोळ झाला असावा, असं म्हटलं जात आहे. भाजपने या प्रकारबद्दल काही प्रतिक्रिया दिली नसून अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आली नाही.

रावेर मतदारसंघातील भाजप खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघ रावेरचा उल्लेख करताना या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख केलेला स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. आपल्याच महिला खासदाराबद्दल अशा असभ्य शब्दांत उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून भाजपला चूक सुधारण्यास सांगितले होते.

‘भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल,’ असा इशाराही देशमुख यांनी दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रितेश- जेनेलियाचा मरणोत्तर अवयव दानाचा निर्णय

News Desk

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री, थेट उद्धव ठाकरेंनाही केले ‘हे’ आवाहन

News Desk

पिंपरी-चिंचवडचा रिकव्हरी रेट जास्त ही समाधानकारक बाब – देवेंद्र फडणवीस

News Desk