मुंबई | सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंग यांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारा एक मोठा गौप्यस्फोट माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. दरम्यान, परमबीर सिंग यांच्या कारनाम्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचं पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.
यावरुन आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकारवर गंभीर टीका केली जात आहे.मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही यावेळी भाजपकडून केली जात आहे. भाजपकडून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे’, असे ट्विट करत पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्ते केली आहे.
राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 20, 2021
तर भाजप नेते किरिट सोमय्या यांनी असं म्हटलं आहे की, ‘परमबीर सिंग म्हणतात खंडणीखोर मी नाही तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आहेत. सचिन वाझे गेले अनेक दिवस त्यांच्या घरी जात होते, त्यांचे वसुली एजंट म्हणून काम करायचे. त्यामुळे अनिल देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करावी’, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
#ParambirSingh ex Mumbai Police Comissioner says real Extortionist is Maharashtra Home Minister #AnilDeshmukh #SachinWaze used to meet him several times. Mr Deshmukh was extorting Money from Pub etc
BJP demand Anil Deshmukh should be sacked immidately from Ministry @BJP4India pic.twitter.com/dhveudyAdW
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 20, 2021
परमबीर सिंगांनी मुख्यमंत्र्यांना काय माहिती दिली होती?
“मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं. एवढच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं”, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केलाय. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे तक्रार करुनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही, असं सांगत परमबीर सिंग यांनी थेट पवारांकडेच बोट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांना आवाहन
भारताचा खरा नागरिक म्हणून मी मागील ३१ वर्षे पोलीस अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेला जागलो आहे. मी खाली नमूद केलेल्या मुद्द्यांची आपण दखल घ्यावी ही विनंती. तसेच तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाच्या संवैधानिक जबाबदाऱ्यांच्या पाठिशी उभे राहा, असं आवाहन परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. या सिंग यांच्या 23 मुद्द्यांच्या या पत्रात पहिला मुद्दा हाच आहे.
परमबीर सिंग यांच्या पत्रात अजून एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. “सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सुचना केली.
त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहीलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल”, असं सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.