HW News Marathi
Covid-19

महाविकासआघाडी गाडी खड्ड्यात की सुरक्षित ? यापेक्षा कोरोनाचा विषय अधिक महत्त्वाचा

नागपूर | “तुम्ही सद्यस्थितीत फक्त कोरोनावर लक्ष केंद्रीत करा. बुलेट ट्रेन नागपूरलाही नेऊ. नागपूर महामार्ग होतोच आहे.”, असा बोचरा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. “सध्या निर्माण झालेल्या कोरोनास्थितीत प्रत्येकाला आपल्या जीविताची चिंता आहे. त्यामुळे या कोरोनास्थितीत सरकारने लोकांच्या जीविताची काळजी करणे, त्याला अधिक प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मग बुलेट ट्रेन नागपूरलाही नेऊ”, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले कि, “महाविकासआघाडी सरकारची गाडी किती चाकी आहे ? पुढे आणि मागे कोण बसले आहे ? ती गाडी खड्ड्यात आहे की सुरक्षित ? यापेक्षा सद्यस्थिती कोरोनाचा विषय अधिक महत्त्वाचा आहे. आता राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्रितपणे या कोरोनाच्या संकटाला सामोरे गेले पाहिजे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत. योग्य वेळेत योग्य आणि आवश्यक ते नियोजन करता आले नाही तर आपल्या गंभीर संकटाला सामोरे जावे लागेल”.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते ?

शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘अनलॉक मुलाखत’ घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, “नागपूरला बुलेट ट्रेनने जोडले असते, तर मला अधिक आनंद झाला असता.” त्याचप्रमाणे, “आमचे सरकार ३ चाकांचे असल्याची टीका होते. तीन चाकी तर तीन चाकी. तीन चाकाची रिक्षाच आहे ती सामान्यांची. पण स्टिअरिंग माझ्याच हाती आहे, पाठीमागे दोघे बसले आहेत. महाराष्ट्रात तीन चाकं तर केंद्रात किती चाकं आहेत? मी एनडीएत होतो तेव्हा ३०-३५ चाकांची रेल्वेगाडीच होती”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र-राज्य सरकारला ‘कोरोना’शी लढण्यासाठी सचिन तेंडुलकरकडून आर्थिक मदत

swarit

राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवणार, राजेश टोपेंची महत्वाची माहिती!

News Desk

महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या, शरद पवारांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

News Desk