HW News Marathi
महाराष्ट्र

‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’ , भाजपकडून मंदिरे सुरू करण्यासाठी आंदोलन

मुंबई | राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज (१३ ऑक्टोबर) भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन सुरु आहे. याठिकाणी धर्मगुरू आणि आचार्यांकडून लाक्षणिक उपोषण केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. ‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’, असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, राज्यात अद्याप मंदिरे बंद असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

१७ मार्चपासून राज्यात मंदिर बंद असल्याने शिर्डीतील अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. रोज करोडो रुपयांची उलाढाल शिर्डीत होत असते. तर देश विदेशातून भाविक साईंच्या दर्शनाला येत असतात. शिर्डीत मोठ्या प्रमाणात हॉटेल, हारफुलें, प्रसाद, मूर्त्यांची विक्रीचा व्यवसाय केला जातो. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय हे मंदिरावर अवलंबून आहेत. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या मागणीने शिर्डीत जोर धरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुर्दैवाने महाराष्ट्रात ब्लू फ्लॅगचा अभिमान बाळगावा असा एकही समुद्रकाठी नाही, सत्यजित तांबेंची आदित्य ठाकरेंकडे नाराजी

News Desk

आषाढी यात्रेसाठी उद्यापासून पालख्यांचं प्रस्थान, भाजप अजूनही पायी वारीवर ठाम

News Desk

राज्यात दिवसभरात ६ हजार ३८४ जण करोनामुक्त; १०५ रूग्णांचा मृत्यू!

News Desk