HW News Marathi
महाराष्ट्र

नितीशकुमार यांच्या पक्षाचं महत्व कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला – पृथ्वीराज चव्हाण 

मुंबई | बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीत आताचे कल कायम राहिले आहे. यात एनडीए पुढं जाताना दिसत आहे. मात्र, त्याबद्दल आताच काही बोलता येणार नाही. नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसला 27 च्या आसपास जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. ते होताना दिसत नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

लोक जनशक्ती पार्टीला वेगळ लढायला लावून नितीशकुमार यांच्या पक्षाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. आमची अपेक्षा मागील जागांपेक्षा जास्त जागा मिळतील अशी आशा होती. काँग्रेस हा राष्ट्रीय विरोधी पक्ष आहे. भाजपला रोखण्याची जबाबदारी आमची आहे, मात्र त्यात यश येताना दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. निवडणूक प्रक्रिया ही निष्पक्षपातीपणे झाली पाहिजे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सभांचा उपयोग वातावरण निर्मिती करण्यासाठी होतो. राजकारण बदलेलं आहे. मोठ्या सभा झाल्यातरी लोकं प्रभावित होते, असं वाटत नाही. आघाडी करुन लढतो तेव्हा स्थानिक लोकांचा निर्णय असतो. ७५ टक्के मतांची मोजणी व्हायची आहे. यानंतर सप्ष्टपणे बोलता येईल, असंही चव्हाण यांनी सांगितले आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी प्रकृती चांगली नसल्याने आक्रमकपणे प्रचार करु शकत नाही. राहुल गांधी यांनी कोणत्या ठिकाणी आणि किती सभा घ्यायच्या याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जातो, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. बिहारच्या निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी जास्त जागा मिळवण्याची शक्यता कमी आहे, असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना भाजपकडून बक्षीस? – सचिन सावंत

News Desk

राज्यातील रुग्णांना मोफत रक्त मिळण्यासाठी धोरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

News Desk

लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna