HW News Marathi
महाराष्ट्र

‘बिजली मल्ल’ म्हणून ख्याती असलेले भाजपचे ज्येष्ठ नेत संभाजी पवार यांचे निधन

सांगली | ‘बिजलीमल्ल’ अशी ख्याती असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे निधन झाले. संभाजी पवार हे सांगलीचे माजी आमदार होते. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रतिस्पर्धी मल्लाला कुस्ती सुरु होऊन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच धोबीपछाड देण्याची खासियत असणारे ‘बिजली मल्ल’ संभाजी पवार यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले आहे.

गेली काही वर्षे ते पार्किन्सनच्या आजाराने त्रस्त होते. गतवर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती. वज्रदेही मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. मात्र एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतीमुळे बिजली मल्ल म्हणून ते प्रसिद्ध झाले.

संभाजी पवार यांची मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्रात ओळखले जात होते. कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्या मल्लाला अवघ्या काही क्षणात चितपट करून आस्मान दाखवण्यात संभाजी पवार हे तरबेज होते. त्यामुळेच महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. याच जोरावर त्यांनी राजकीय आखाड्यात नशीब आजमावून पाहिले आणि वसंतरावदादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णु अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून त्यांनी जायंट किलर अशी ख्याती मिळवली. शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना भारतीय जनता दलाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती.

२००९ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.२०१४ साली पक्षातील स्थानिक नेत्यांशी झालेल्या मतभेदानंतर ते राजकीय दृष्ट्या बाजूला झाले होते. मात्र, तरी सातत्याने विविध प्रश्नांवर ते आपली मते मांडत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची हळहळ सांगलीत व्यक्त होत आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही! – छगन भुजबळ

Aprna

खरिपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण, वरूनराजा बरसण्याची प्रतीक्षा दादा भुसेंची माहिती!

News Desk

आर्यन खानचा एनसीबी कोठडीमधील मुक्काम दोन दिवसांनी वाढला

News Desk