HW News Marathi
महाराष्ट्र

मी पाटील आहे, राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण …! – चंद्रकांत पाटील

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत हे भाजप नेत्यांना उद्देशून वापरलेल्या आपल्या काही अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवराळ शब्दांसाठी टीकेचे धनी होत आहेत. तरीही आपल्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना संजय राऊत यांनी “समोरच्याला जी भाषा कळते, त्या भाषेत आपण बोलतो”, असेही पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही”, असे चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (२१ फेब्रुवारी) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सध्या देशात तिसऱ्या आघाडीची देखील चर्चा सुरु आहे. रविवारी (२० फेब्रुवारी) तेलंगणाचे मुख्यमंत्री मुंबईत आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांनी भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केल्याचे वृत्त आहे. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१९ च्या लोकसभेपूर्वी असेच बिगर भाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते व आता भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून पक्षाला ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील.”

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, “२०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाच”, असा टोला सुद्धा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत! -बाळासाहेब थोरात

News Desk

‘…तर आपला काडकन आवाज आला पाहिजे’, बाळासाहेबांचा तो व्हिडीओ महापौरांकडून शेअर!

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करणे शक्य !

swarit