HW News Marathi
महाराष्ट्र

ज्यांना भाषेविषयी शंका आहे, त्यांनी मराठी डिक्शनरी पाहावी!, राऊतांचा पाटलांना टोला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेता किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करताना पातळी सोडून टीका करत असल्याचे दिसून येत आहे. राऊतांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सोमय्यांना दलाल, भXX आदी शब्दाचा उपयोग करत टीका केली आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राऊत वापरत असलेली भाषा योग्य नाही, असे म्हणाले होते. यावर राऊतांनी आज (२१ फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. तसेच ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली मराठी डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंतांची पुस्तक वाचावी.”

राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात एखादा पक्ष राज्याची सतत बदनामी करत असेल किंवा थुंकत असेल, तर त्याची काय आरती करावी, असे ज्यांना वाटत असेल त्यांनी आरती करावी. आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. आणि ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली मराठी डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंताची पुस्तके वाचावी, असा सल्ला त्यांनी पाटलांना दिला आहे. 

“महाराष्ट्रातल्या लोकांना कुणीही मराठी शिकवू नये, आणि चांगल्या कामासाठी किंवा देशाच्या विकासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन काम करणार असेल, तर लोकशाहीत नक्कीच स्वागत व्हायला पाहिजे. परंतु, आपल्या देशातील काही लोकांना लोकशाहीचा अर्थ कळालेलाच नाही. जे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत, ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी कायम द्वेष आहे. अशा लोकांना जी भाषा समजते, त्या भाषेतचे बोलावे, असे आमच्या सांधू संतांनी सांगतेल,” असे राऊत म्हणाले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना विधानपरिषद निवडणूक स्वबळावर लढवणार

News Desk

‘वर्क फ्रॉम होम’मुळे वीज वापरात वाढ | उर्जामंत्री नितीन राऊत

News Desk

‘निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार?’, फडणवीसांचा सवाल

News Desk