HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर तुरुंगात बसून एसटीपण चालवू शकतील”, भाजपचा अनिल परबांना टोला

मुंबई | ईडीचं सावट सध्या शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते अनिल परब यांच्यावर आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटके नंतर शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याचे संकेत भाजप नेत्यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. यावरुनच आता भाजपाने अनिल परबांना टोला लगावला आहे.

काय आहे ट्विट?

भाजपाचे मीडिया पॅनलिस्ट अवधूत वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “घरी बसून जर सरकार चालवू शकतात तर तुरुंगात बसून ST पण चालवू शकतील. काही शंका?”

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अनिल परब यांना ‘ईडी’ने मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस शनिवारी रात्री बजावली. नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपाच्या काही नेत्यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. राणे यांनीही शिवसेना नेत्यांना सोडणार नाही, असे विधान केले होते.

राणे यांच्या कोकणातील जनआशीर्वाद यात्रेची सांगता होत असतानाच परब यांना नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई सुडाने आणि ठरवून करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे. ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभाग या दोन यंत्रणा भाजपाच्या शाखा असल्याप्रमाणेच काम करत असल्याची टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून दोन दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच ईडी व अन्य यंत्रणांचा भाजपकडून वापर केला जात असल्याचे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी नागपूरमध्ये केले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाडमध्ये मोठी दुर्घटना, तळई गावात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू…!

News Desk

विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार! – वर्षा गायकवाड

News Desk

मुंबईत मास्क आणि सॅनिटायझरचा १४ कोटी रुपयांचा जप्त

swarit