HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी सरकारची ताकद उभी करु! | नाना पटोले

मुंबई | “मराठी चित्रपट निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोरोना महामारीच्या संकटामुळे चित्रपट निर्माते व रंगकर्मी यांचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व त्यांना सर्व ती ताकद देऊ”, असं आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे. मराठी चित्रपट निर्मात्यांची बैठक टिळक भवन येथे पार पडली. यावेळी पटोले बोलत होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले की, “चित्रपटांना उद्योगाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा विचार असून त्यादृष्टीने काम सुरु आहे. उद्योगाचा दर्जा मिळाल्यास अनेक सवलतीही मिळतील. नाशिकमध्ये चित्रनगरी निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे तसेच विदर्भातही एक चित्रनगरी उभा रहावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. आज ज्या मागण्यांचे निवेदन दिलं आहे. त्या सर्व मागण्या तत्वतः मान्य असून चित्रपटांना अनुदानही दिलं जाईल व इतर मागण्यांवरही निर्णय घेतला जाईल.”

“चित्रपट व नाट्यगृहांना परवानगी देताना ५० टक्के प्रक्षेकांची परवानगी दिली आहे ती १०० टक्के देण्यासाठी प्रयत्न करु. एकपडदा चित्रपटगृहाबद्दल एक सर्वंकष धोरण ठरवलं जात आहे तसेच मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करावेत यासाठी प्रयत्न करु”, असं आश्वासन देखील अमित देशमुख यांनी दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेतला जाणार – धनंजय मुंडे

News Desk

भाजप-शिवसेना युतीचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित !

News Desk

जाणून घ्या… गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्व आणि मुहूर्त

News Desk