HW News Marathi
देश / विदेश

“काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा”, भाजपच्या नेत्याची सडकून टीका

नवी दिल्ली । देशात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद हा काही नवीन नाहीये रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करताना आपल्याला दिसतात त्यात आता पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसवर टीका करत पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

‘काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा’ असल्याचा म्हणत भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय त्याचबरोबर गांधी परिवाराच्या नेतृत्वावर देखील त्यांनी टीका करत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर हे टीकास्त्र सोडले. एका वृत्तवाहिनीच्या चर्चेमध्ये ते सहभागी झाले आणि त्याच वेळी त्यांनी काँग्रेसवर ही टीका केली आहे.

” एखाद्या पक्षाची ओळख म्हणजे त्याची विचारधारा आणि नेतृत्व असतं. भारतीय जनता पार्टीचे विचारधारा स्पष्ट आहे आणि आमचे नेतृत्व म्हणजे मोदीची देशातच नव्हे तर जगभरातल सर्वात खंबीर नेतृत्व आहे. पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर काँग्रेस हा टायटॅनिकच्या जहाजा सारखा आहे. तो बुडत चालला आहे. बुडणार तर आहेच तो कारण राहुल गांधींच्या परिवारा व्यतिरिक्त जर कोणीही उठून दिसू लागला तर त्याला दाबून टाकल जातं.

तसेच, त्याला बाजूला केलं जातं म्हणून पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंह विरुद्ध नवजोत सिंह सिद्धू, राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट आणि समाजवादी पार्टी तर एकाच परिवारातल्या सदस्यांनी तयार झालेली आहे. अध्यक्ष त्याच परिवारातील आहेत” असं म्हटलं आहे. गौरव भाटिया यांनी “मुकुल रॉय यांच्याबद्दल मी म्हणेन की येथेही फरक आपल्याला दिसून येतो. जेव्हा जितीन प्रसाद काँग्रेस सोडून जातात तेव्हा मध्य प्रदेशातली काँग्रेसची शाखा म्हणते की, तो कचरा होता, कचरापेटीत गेला. पण जेव्हा मुकूल रॉय सोडून गेले, तेव्हा आम्ही अशा प्रकारच कोणतेही वक्तव्य केलं नाही”

असं म्हटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालायने भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानात पाठविण्याबाबतची याचिका फेटाळली

News Desk

प्रमोद मुतालिक यांनी केली गौरी लंकेश यांची कुत्र्यांशी तुलना

News Desk

‘सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारलं’, कारण…..

News Desk