HW News Marathi
महाराष्ट्र

“जन-आशीर्वाद यात्रेला विरोध कराल तर…” भाजपचा शिवसेनेला थेट इशारा

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द काढल्याने त्यानं अटक करण्यात अली होती, मात्र काही तासात त्यांना जमीनही मिळाला. नारायण राणे यांच्या नेतृत्वात सुरु झालेली जन-आशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा त्याच उत्साहाने सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. त्यानंतर आता शिवसेनेनं जर जन-आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार, असा इशारा कोकण जन-आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिलाय. त्यामुळे भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेवरुन पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरवाजा तोडण्याची धमकी देत

नारायण राणे यांच्या अटकेसाठी आलेले पोलीस दरवाजा तोडण्याची धमकी देत होते. मोगलाई सुरु आहे. म्हणून मी यांची तुलना औरंगजेबाशी केली. संभाजी महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. राजन साळवी यांना इतिहासाचं ज्ञान नाही. पॅसिफिक महासागरातील बेटावरुन त्यांनी डॉक्टरेट ही पदवी आणली आहे. कुणीतरी त्यांना भडकवलं आहे. असं करा नाहीतर पुढच्यावेळी तुम्हाला तिकीट नाही. आणि त्याची लस इकडे लागवी म्हणून वैभव नाईकांना सांगितलं तुम्ही नाही बोललं तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. हे दोघेही दु:खी आत्मे आहेत. अशा शब्दात प्रमोद जठार यांनी टीका केलीय.

अनिल परब यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या दोन कटप्पांनी बाहुबलीचा गेम केला. संजय राऊत आणि फडणवीस यांच्याकडे बघितलं तर नक्की गांजा कोण प्यायला आहे, हे लक्षात येतं. मराठा समाजाच्या आंदोलनावेळी मुका मोर्चा लिहिणाऱ्या संजय राऊत यांनी त्यावेळी गांजाची की अफूची गोळी घेतली होती? असा खोचक सवालही प्रमोद जठार यांनी विचारला आहे.

सिंधुदुर्गात यात्रेचा दिमाखदार शेवट होणार

नारायण राणेंची जनाशीर्वाद यात्रा होणार कि नाही यावर सगळ्यांचा डोळा होता. यावर प्रमोद जठार यांनी उत्तर दिलं आहे. यात्रेला विरोध करायला आमदार वैभव नाईक यांनी यावं. मग आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ… हत्ती चालतो तेव्हा कुत्रे भुंकत असतात. नियम पाळून आम्ही यात्रा काढणार आहोत. यात्रा निघणारच…. सिंधुदुर्गात यात्रेचा दिमाखदार शेवट होणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

दादांचं जंगी स्वागत करण्यासाठी समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसली

नारायण राणे यांच्या स्वागतासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेलं कणकवली शहर सज्ज झालंय. अगदी पहिल्यापासून राणेंना ज्या कणकवलीने डोक्यावर घेतलं, त्यांना कधी अंतर दिलं नाही, त्याच राणेप्रेमी कणकवली शहरांत चौकाचौकात राणेंच्या स्वागताला गुढ्या उभारल्या गेल्या आहेत. कालच्या राणे-सेना राड्यानंतर दादांचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या भेटीनंतर खडसे आज उद्धव ठाकरेंना भेटणार

News Desk

सीएलएसएस योजनेच्या विस्ताराची घोषणा

News Desk

मोहन डेलकरांच्या आत्महत्या प्रकरणाचा खोलापर्यंत तपास करून सर्व काही बाहेर काढू – उद्दव ठाकरे   

News Desk