HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात अजून 25 -30 वर्ष भाजपची सत्ता येणार नाही; संजय राऊतांचा दावा

मुंबई | देशातील पाच राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या रणधुमाळी सुरू आहे. तर महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापू लागलंय. तसेच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप हे पक्ष एकमेकांवर सतत टीका करताना दिसतात. अशातच आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजप संदर्भात मोठा दावा केला आहे. काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री येणार नाही. पुढील २५-३० वर्षे तरी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना या संदर्भात विधान केलं आहे. राऊत म्हणाले, “भाजपने स्वत:हूनच अंधाऱ्या विहिरीमध्ये उडी मारली आहे. त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे.ठीक आहे, उद्या ब्रिटनचा पंतप्रधानही त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असंही ते सांगू शकतात. परंतु, काही झालं तरी महाराष्ट्रात मात्र त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही. महाराष्ट्रात पुढील २५ ते ३० वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. तसेच तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही”, असं राऊत म्हणाले. तसेच २०२४ मध्ये ज्या निवडणूक होणार आहेत, त्यातही दिल्लीतील चित्रं बदलेलं दिसेल, असंही ते म्हणाले. त्यामुळे भाजपने आता महाराष्ट्र विसरून जावं. त्यांची १०० लोकं जिंकतील, ७५ लोकं जिंकतील अजून काही करतील पण महाविकास आघाडी हेच महाराष्ट्राचं भविष्य आहे, असा दावाही राऊतांनी केला आहे.

यावेळी राऊतांनी भाजप-शिवसेना युतीविषयी भाष्य केलं आहे. ते म्हणाले,”भाजप व शिवसेनेच्या युतीची कसलीही चर्चा नाहीये. कुणाशीही चर्चा नाही. दबके आवाज वगैरे असं काही नसतं. आमच्याकडून कोणी परस्पर कमेंट करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तो केवळ मूर्खपणा आहे. शिवसेना-भाजप युतीवेळी आम्ही थोडंफार एकत्र नांदलो. मात्र, ते नातं आता भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलेलं आहे. त्यामुळे जे वैफल्यग्रस्त असतात, निराश मनाने राजकारण करणारे असतात, त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशा असते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल !

News Desk

राज्यपालांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवलेले १२ राज्यपाल नियुक्त सदस्य मोकळे करावेत!  

News Desk

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्याला पोलीसांनी केली अटक

News Desk