HW News Marathi
महाराष्ट्र

‘बेळगाव महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला!’

बेळगाव | बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत बेळगावात भाजपची सत्ता निवडून अली आहे. भाजपाने ३६ जागा मिळवत बहुतमतात असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे.

भाजपाला स्पष्ट बहुमत

बेळगाव निवडणुकांमध्ये भाजप बहुमतांनी निवडून आलं आहे. बेळगाव महापालिका निवडणुकीत निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, असे नोलन पिंटो यांनी म्हटले आहे. भाजपाला ३६ जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला ९ आणि इतरांना बेळगावी नगरपालिकेच्या एकूण ५८ जागांपैकी १३ जागा मिळाल्या आहेत.

मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. बेळगावमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता येईल असा संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे. तिथले मराठी भाषिक एकत्र आले आहेत आणि पुन्हा पालिकेवर भगवा ध्वज फडकवतील. आमच्या मनात जे आहे तेच व्हाव अशी आशा आम्ही करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपाने बेळगाव महापालिकेवर सत्ता मिळवली आहे.

मराठी भाषकांनी हिरिरीने मतदानात सहभाग नोंदवला

बेळगाव महापालिकेच्या ५८ प्रभागांसाठी शुक्रवारी प्राथमिक अंदाजानुसार ५५ टक्के मतदान झाले होते. मराठी अस्मितेचे दर्शन घडवण्यासाठी मराठी भाषकांनी हिरिरीने मतदानात सहभाग नोंदवला होता. सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेची निवडणूक आठ वर्षांनंतर झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच चिन्हावर उतरले होते. त्यामध्ये भाजपा ५५, काँग्रेस ४५, धर्मनिरपेक्ष जनता दल ११, आम आदमी ३७, एमआयएम ७, अन्य दोन अपक्ष अशा २१७ उमेदवारांचा समावेश होता.

कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली

मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे. तसेच, मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

बेळगाव पालिकेवर छत्रपती हंसिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकेल

कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसेच उत्साही वातावरण दिसत आहे. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा! – मुख्यमंत्री 

Aprna

राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदीच बांधणार !

News Desk

सर्वसामान्य कार्यकर्ता झाला गोकुळचा संचालक, बंटी पाटलांच्या या विश्वासाने बयाजी शेळकेंना अश्रू अनावर

News Desk