HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचा दणका! नागपूर विधान परिषदेत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय

मुंबई | विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. बावनकुळेंचा ३६२ मतांनी विजयी झाला आहे. तर बावनकुळे विरोधात मतदानच्या एक दिवस आधीच काँग्रेसने पाठिंबा दिलेले उपक्ष उमेदवार मंगेश देशमुख १८६ मतांनी पराभव झाला तर भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना फक्त एक मत मिळाले आहे. नागरपूरमध्ये महाविकसआघाडीचे ४४ मते फुटली आहे

दरम्यान,अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला. या मतदारसंघात खंडेलवालांना ४३८ मतांनी विजयी झाला असून त्यांच्याविरोधातील शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३० मतांनी पराभव झाला आहे. या मतदारसंघात महाविकासआघाडी १९७ मते फुटली असून जवळपास ३१ मते अवैध ठरली आहेत.

इथल्या महविकासआघाडीला चपराक | फडणवीस

“महाराष्ट्रातील जनता ही भाजपच्या पाठिशी आहे. इथल्या महविकासआघाडीला चपराक दिली आहे.माझे सहकारी बावनकुळे यांचा विजय झाल्याने मी आनंद आहे,” असल्याचे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. या विधानपरिषदेच्या निवडणुकीवरुन आगामी महापालिका निवडणुकीवर परिणाम होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या महापालिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही पक्षांना जोरदार फटाक बसेल. बावनकुळेंना निवडून आण्यासाठी भाजपचे सर्व नगरसेवक एकत्र आले. याचा फायदा बावनकुळेंना विधानपरिषदेत झाला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणी साक्षीदार पूजा सकटचा मृत्यू

News Desk

कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्डचा घोळ

News Desk

“तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?”, रोहिणी खडसेंनी भाजप आमदाराला सुनावले

News Desk