मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज सामनाच्या मुखपत्रातून शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. शहा भाजपच्या संपर्क अभियानासाठी मुंबईत येणार आहेत. या अभियाना निमित्ताने शहा ठाकरे व्यतिरिक्त अभिनेत्री माधुरी दिक्षीत, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेणार आहे.
- सामनात नेमके काय म्हटले
भारतीय जनता पक्षाने एक व्यापक संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे जगभ्रमणावर तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशभ्रमणावर आहेत. एनडीएतील घटक पक्षांना श्री. शहा भेटणार आहेत म्हणजे नक्की काय करणार आहेत? व ते नेमके आताच म्हणजे पोटनिवडणुकांत भाजपची धूळधाण उडाल्यावरच का भेटत आहेत, हासुद्धा प्रश्नच आहे. २०१९च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच आहे. पालघर पोटनिवडणुकीतील निकालाने शिवसेनेचे ‘स्व’बळ दाखवून दिले आहेच. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या संपर्क अभियानामागे २०१९च्या सार्वत्रिक निवडणुका हे एक कारण होऊ शकते; पण मुळात सरकार पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे व त्यामागची कारणे शोधायला हवीत.
शिवसेनेसारखे पक्ष हे कायम जनसंपर्क, जनाधार यावरच वाटचाल करीत असतात व त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी, लढण्यासाठी कोणत्याही ‘पोस्टर बॉय’ची गरज नसते. गरजेनुसार पोस्टरवरची चित्रे बदलायची व मते मागायची हे धंदे आम्ही केले नाहीत. आता पालघर निवडणुकीचेच पहा… या निवडणुकीत भाजपच्या पोस्टरवरून मोदी, शहा अनेक ठिकाणी गायब झाले व त्या जागी स्व. चिंतामण वनगांचे फोटो आले. चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी त्यास आक्षेप घेऊनही भाजपवाले मोदींच्या नावाने नव्हे तर वनगांच्या नावाने मते मागत राहिले; पण काँग्रेसचे गावीत यांचा विजय होताच भाजपवाले आनंदाने नाचू लागले
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.