HW News Marathi
देश / विदेश

छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान होऊनही भाजपचे तोंड बंद !

मुंबई | ‘छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान होऊनही भाजपचे यावर तोंड बंद आंदोलन सुरु आहे’, अशी बोचरी टीका आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (२२ जुलै) राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. यावेळी इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर उदयनराजेंनी “जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी”ची घोषणा दिली. मात्र, यावरून उदयनराजेंना सुनावत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. राज्यसभा खासदारांच्या शपथविधीदरम्यान घडलेल्या या प्रकारचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत.राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष भाजपविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

उदयनराजेंच्या खासदारकीच्या शपथीदरम्यान झालेल्या या प्रकारामुळे व्यंकय्या नायडू यांच्यासह भाजपवर टीकेची झोड उठत आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही…जय भवानी! जय शिवाजी!!!!!!!”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजपने पक्ष म्हणून आपली भूमिका स्पष्ट करावी करावी मागणी अशी मागणी आता जोर धरत आहे. त्यामुळे, भाजपची नेमकी या भूमिका स्पष्ट करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे ?

व्यंकय्या नायडू उदयनराजेंना काय म्हणाले ?

भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी’ची घोषणा दिल्यानंतर व्यंकय्या नायडू म्हणाले कि, “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत नाही तर माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतले जात नाही. सभागृहात अशा कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. तुम्ही नवीन सदस्य आहेत. त्यामुळे भविष्यात हे लक्षात ठेवावे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, अभिनेत्री आता या प्रकल्पाची असणार ब्रँड अ‍ॅम्बेसिडर!

News Desk

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना अतिदक्षता विभागातून हलवले

News Desk

जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna