बीड | राज्यात आज (१९ जानेवारी) सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत असून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यातून धक्कादायक निकाल हाती आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.
नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात मुंडे बहीण-भावात मोठे शाब्दिक युद्ध पहायला मिळाले होते. तर, आरोप आणि प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्याचे चित्रही पहायला मिळाले होते. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून यामध्ये धनंजय मुंडे यांना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी जोर का झटका दिला आहे. यामुळे धनंजय मुंडेंवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे.
राज्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बीडमधील आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम राहिले आहे. तर केज नगरपंचायतीमध्ये जनविकास आघाडी पक्ष्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले. तसेच वडवणी नगर पंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्याचे चित्र पहायला मिळते आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर या तीनही नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक जागा जिंकून भाजप बहुमताकडे वाटचाल केली असल्याचे पहावयास मिळाले आहे.
सत्ता असूनही यश मिळवण्यात सत्ताधारी अपयशी
दरम्यान, निवडणूक निकालानंतर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंनाही टोला लगावला आहे. सत्ता असून देखील यश मिळवणं कठीण झालं आहे. जनतेने भाजपला चांगली साथ दिली आहे, असं त्या म्हणाल्या. “मी निकाल पाहते आहे. राज्यातील इतर ठिकाणीही लोकांनी भाजपला मोठ्या प्रमाणात साथ देताना दिसत आहे. तसंच बीड जिल्ह्यात ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका होत्या, त्या सर्व नगरपंचायतीमध्ये भाजपला बहुमत मिळल्याचे स्पष्ट झालं असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
जिल्ह्यातील ५ नगरपंचायतमधील ८५ जागांसाठी निवडणूक
१) आष्टी – १७ भाजपा विजयी
भाजप – १३
शिवसेना –
राष्ट्रवादी – ०२
काँग्रेस – ०१
इतर – ०१
२) शिरूर कासार नगरपंचायत – १७ भाजपा विजयी
भाजप – ११
राष्ट्रवादी – ०४
शिवसेना – ०२
३) पाटोदा ग्रामपंचायत – १७ राष्ट्रवादी च्या ताब्यात
भाजप – ०९
भाजप पुरस्कृत – ०६
महावि – ०२
४) वडवणी नगरपंचायत – १७
भाजप – ८
राष्ट्रवादी – ८
राष्ट्रवादी पुरस्कृत – १
५) केज – १७
बीडमध्ये भाजपचं वर्चस्व; निकालानंतर पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला
राष्ट्रवादी – ०५
काँग्रेस – ०३
जनविकास आघाडी पक्ष – ०८
स्वाभिमानी शेतकरी सनघटना – ०१
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.